Anganwadi Mandhan Vadh 2023 – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ, संप मागे.
Anganwadi Mandhan Vadh 2023
राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात 1500 रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघाने केली.
मानधन वाढ, पेन्शन योजना लागू करावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांनी २० फब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाड्या बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होती. “Anganwadi Mandhan Vadh “
सोबतच गर्भवती मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही संपाचा प्रतिकूल परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत मानधन वाढीसह पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत चर्चा झाली.
अंगणवाडीचे महत्त्व काय?
अंगणवाडी हे भारतातील एक प्रकारचे ग्रामीण बाल संगोपन केंद्र आहे. बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने 1975 मध्ये ते सुरू केले होते. अंगणवाडीचा हिंदीत अर्थ इंग्रजीत “अंगण निवारा” असा होतो.
अंगणवाडी सेविका मानधन वाढ किती रुपयांनी झाली आहे?
अंगणवाडी सेविका मानधन वाढ 1,500 रुपयांनी झाली आहे.