आमची अविस्मरणीय सहल मराठी निबंध Aamchi Avismarniya Sahal

aamchi avismarniya sahal marathi nibandh मित्रांनो आज आपण आमची अविस्मरणीय सहल निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

लेखक – प्रवीण संकपाळ

aamchi avismarniya sahal marathi nibandh
aamchi avismarniya sahal marathi nibandh

आमची अविस्मरणीय सहल मराठी निबंध

aamchi avismarniya sahal marathi nibandh:- दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेची सहल आयोजित करण्यात आली होती. आम्ही सर्व विद्यार्थी सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो.

सरांनी १५ दिवस आधीच सहलीची दिवस विद्यार्थ्यांना सांगितला. आम्हाला खूप आनंद झाला होता. मागच्या वर्षीची सहल अजून डोळ्यांसमोर होती. मला तर खूप घाई होती सहलीला जाण्याची.

सरांनी सहलीची दिवस सांगितल्यापासून आम्हा विद्यार्थ्यांची वर्गामध्ये एकाच गोष्टीची चर्चा सुरू होती ती म्हणजे सहलीचे ठिकाण कोणते?

तेवढ्यात सर वर्गात आले आणि सरांनी सहलीचे स्थळ आणि वेळ आम्हाला सांगितली. आमच्या सहलीचे ठिकाण होते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड.

सरांनी आम्हाला किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व सहलीला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले.

सहलीचा दिवस संगीतल्यापासूनच मी तयारीला लागलो. मला ओढ लागली होती ती किल्ल्याला भेट देण्याची.

सांगितल्याप्रमाणे सहलीचा दिवस उजाडला. आम्ही सर्व जण सरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी ६.३० वाजता शाळेच्या मैदानात जमलो. सर्वांचे आईबाबा विद्यार्थ्यांना सोडायला सोबत चालते.

सहल असल्यामुळे सर्व मुले अगदी वेळेत उपस्थित होती. कोणीही दांडी मारली नाही. aamchi avismarniya sahal marathi nibandh

सरांनी सर्व मुलांना काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपण ऐतिहासिक ठिकाणी निघालो आहे. कोणीही गैरवर्तन करणार नाही.

सरांनी सर्व मुलांची हजेरी घेतली. सहलीला जाण्यासाठी आमच्या शाळेने बसची व्यवस्था केली होती. आम्ही सर्व मुले बस मध्ये जाऊन बसलो.

माझी अविस्मरणीय सहल

aamchi avismarniya sahal marathi nibandh:- सकाळी ७ वाजता आमची बस किल्ले प्रतापगडच्या दिशेने निघाली. गाडीमध्ये आम्ही खूप मज्जा केली.

बसमध्ये आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळल्या. बघता बघता आमची बस गडाच्या पायथ्याशी येऊन पोहचली.

कधी गाडीतून उतरतोय आणि गड पाहतोय असे झाले होते. सरांनी किल्ल्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती देणास सुरुवात केली.

किल्ले सिंहगडाची उंची ही ३५५६ फूट एवढी आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. सरांनी किल्ल्यावरील महत्वाची ठिकाणे आम्हाला सांगितली.

बस मधून उतरल्यावर पार्किंग लॉट मधून टेहाळणी बुरुजाचे दृश्य खूप छान होते. सरळ वाटेने आम्ही चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो.

सरांनी आम्हाला आम्हाला महाद्वाराच्या रचनेबद्दल खूप माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीने हा दरवाजा तटबंदीमध्ये लपवलेला आहे. महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला एक तोफ पाहायला मिळाली.

महाद्वारातुन पुढे येऊन उजव्या बाजूने वर गेल्यावर चिलखती बुरूज पाहायला मिळाला. सरांनी आम्हाला गडावरील पिण्याच्या पाण्याचे टाके दाखवले.

aamchi avismarniya sahal marathi nibandh

aamchi avismarniya sahal marathi nibandh महाद्वारामधून पुढे गेल्यावर भवानी मातेच्या मंदिराकडे आम्ही निघालो. आम्ही भवानी देवीचे दर्शन घेलते व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आम्ही पहिली.

गडाची चढाई एवढी अवघड न्हवती तरीही आम्हाला थोडेशे थकल्यासारखे जाणवले. गडभ्रमंती करत असताना आम्हाला अनेक दुकाने पाहायला मिळाली.

सरांनी एका दुकालाजवळ आम्हाला थांबवले. त्या दुकानातून काही जणांनी खाऊ घेतला तर काही जणांनी थंडगार ताक पिले.

थंडगार ताकाची चव खूप मस्त होती.

 Aamchi Avismarniya Sahal Marathi Nibandh

Aamchi Avismarniya Sahal Marathi Nibandh

भवानी देवीच्या मंदिराबाहेरील परिसरात ठेवलेल्या सहा वेगवेगळ्या आकाराच्या तोफा आम्हाला पाहायला मिळाल्या.

भवानी मातेचे दर्शन घेऊन आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो.

बालेकिल्ल्याकडे जात असताना उजव्या बाजूला आम्हाला मारुतींचे मंदिर पाहायला मिळाले. आम्ही मारुतींचे दर्शन घेऊन पुढच्या गदभ्रमंतीसाठी निघालो.

थोडेसे ऊन पडले होते आणि आम्हाला भूकही लागली होती. म्हणून आम्ही सर्वांनी सोबत डबे आणले होते. सर्वांनी एकत्रित बसून जेवण केले.

सरांनी आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आधीच समजावून सांगितल्या होत्या.

ऐतिहासिक ठिकाणी कचरा न करणे, आपल्याला कुठे कचरा दिसला तर तो उचलून कचरापेटी मध्ये टाकावा.

मारुती मंदिराकडून पुढे गेल्यावर आम्ही बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. दरवाजा आजही व्यवस्थित अवस्थेत होता.

aamchi avismarniya sahal

aamchi avismarniya sahal marathi nibandh सरांनी इथे आम्हाला एका गोष्टीची आठवण करून दिली ती म्हणजे जसे मुख्य प्रवेशद्वार तटबंदीमध्ये लपवलेले होते तसेच बालेकिल्ल्याचे महाद्वाराची रचनासुद्धा गोमुखी पद्धतीची होती.

बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यावर आम्हाला केदारेश्वर मंदिर व सदर पाहायला मिळाली.

किल्ले प्रतापगडवर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळाला. किल्ल्यावर आम्हाला रेडका बुरूज, यशवंत बुरूज हे बुरूज पाहायला मिळाले.

किल्ल्यावरून आजूबाजूचा हिरवागार परिसर खूप छान दिसतो. आमची एक दिवसाची सहल असल्यामुळे आम्हाला घरीसुद्धा लवकर घरी पोहचायचे होते.

गडावरील सर्व ठिकाणे पाहून झाली होती. मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही भेट दिलेल्या जागेची होईल तेवढी स्वछता केली.

आम्हाला आजूबाजूला जेवढा कचरा दिसला तो आम्ही गोळा करून कचरपेटीमध्ये टाकला.

शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात आम्हाला वृक्षारोपणाचे महत्व सांगण्यात आले होते. मी एक छोटेसे रोप सोबत घेऊन आलो होतो. एका ठिकाणी ते मी झाड लावले.

स्वछता करून झाल्यावर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. आम्हाला लवकर परत निघायचे होते म्हणून सरांनी परत निघण्याचा निर्णय घेतला. आम्ही बस जवळ पोहचलो.

सरांनी पुन्हा एकदा हजेरी घेतली. सर्व विद्यार्थी आहेत का हे बघितले व आम्ही परतीच्या प्रवासकडे निघालो.

मला परत जाऊच वाटत न्हवते. मला राहून राहून प्रतापगड किल्ला आठवत होता. आम्ही मज्जा करत शाळेच्या मैदानात येऊन पोहचलो. आईबाबा माझी वाट पाहत होते.

सरांनी आमची खूप काळजी घेतली. आम्ही सहल एकदम मस्त झाली.

निष्कर्ष-सहलीमध्ये खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या. ऐतिहासिक वास्तूंबद्दल मला माहिती मिळाली.म्हणून ही माझी अविस्मरणीय सहल होती.

तर मित्रांना तुम्हाला “Aamchi Avismarniya Sahal Marathi Nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे आमची अविस्मरणीय सहल मराठी निबंध मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. ती कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Comment

close button