Aadhar Card Ration Card Update – आता आधार कार्डद्वारेही घेता येणार रेशन.
Aadhar Card Ration Card Update
सरकारने देशभरात जारी केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे. आता रेशनकार्ड व्यतिरिक्त मोफत रेशन योजनेंतर्गत आधार कार्डद्वारेही तुम्हाला रेशन घेता येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. सरकारच्या या योजनेची चर्चा होत आहे. कारण, या योजनेशी 80 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत.
आता आधार कार्ड द्वारे घेता येणार रेशन धान्य
सरकारने देशभरात जारी केलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणे आता सोपे होणार आहे. आता रेशनकार्ड व्यतिरिक्त मोफत रेशन योजनेंतर्गत आधार कार्डद्वारेही तुम्हाला रेशन घेता येणार आहे. या संदर्भात युआयडीने ट्विट करत माहिती दिली आहे. युआयडीने ट्विट करत सांगितले की, आता देशभरात आधार कार्डद्वारे रेशन घेण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.