Aadhar Card Documents Update – दहा वर्षे जुने आधार कार्ड अद्ययावत करणार. 14 जूनपर्यंतची मुदत; अन्यथा आधार कार्ड होणार रद्द.
Aadhar Card Documents Update
दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्ययावत करावे लागणार आहे. यासाठी 14 जूनची डेडलाईन देण्यात आली आहे. या मुदतीत कार्ड अद्ययावतीकरण झाले नाही; तर आधार कार्ड रद्द होणार आहे. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत. ‘Aadhar Card Documents Update’
विविध योजनांसह बँक, रेशन व्यवस्था, शासकीय कामकाज आदींसाठी आधार कार्ड महत्त्वाचा घटक आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने यामध्ये अनेक बदल होत असतात. पत्ता, बोटांचे ठसे, या शिबिरात आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मदिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई- मेल आदी डेमोग्राफिक अपडेट, तर हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटिना स्कॅन, असे बायोमेट्रिक अपडेट करता येणार आहे. डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये, तर बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदी अद्ययावत होणे आवश्यक आहे. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार कार्ड अद्ययावत करणे बंधनकारक आहे. “Aadhar Card Documents Update”
तुमचे आधार कार्ड अपडेट करा
ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांना आता आपले आधार कार्ड अद्ययावत करावे लागणार आहे. संबंधित नागरिकांना जवळच्या आधार केंद्रावर जाऊन कार्ड अद्ययावत करून घेण्यासाठी जिल्ह्यात शिबिर आयोजित केली जाणार आहेत. त्याचे वेळापत्रक जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.
ॲप व संकेतस्थळावरून
अद्ययावतीकरणासाठी शुल्क नाही नागरिकांना आधार कार्डचे अद्ययावतीकरण ॲपद्वारे व संकेतस्थळावरूनही करता येणार आहे. myAadhaar पोर्टल (myaadhaar.uidai.gov.in) वरून 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीत आधार कार्डवरील माहिती अद्ययावत केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतर 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. {Aadhar Card Documents Update}
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇👇👇👇