आता सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर येणार | 712 utara mobile number update

712 utara mobile number update –  राज्यातील सर्व प्रकारच्या सातबाराधारकांच्या ‘सातबारा’वर मोबाईल क्रमांकासह ई-मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या वेळी होणाऱ्या गैरव्यवहारास आळा बसणार आहे.

712 utara mobile number update

संबंधित मालमत्तेवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे की नाही, याची माहिती मिळणार असून, संबंधित सातबाराधारकास तलाठी अथवा अधिकाऱ्यांना संपर्क साधणे सोपे होणार आहे. राज्यात सुमारे 2 कोटी 56 लाख सातबारा उतारे आहेत.

हे सर्व सातबारा ऑनलाइन करण्यात आले आहेत. या कामांसाठी आवश्यक बनले आहेत. असे असले तरी मागील काही वर्षांपासून जमीन खरेदी-विक्री करताना जमिनीबाबत गैरव्यवहार असल्याची अनेक प्रकरणे सातबाऱ्यांवर कोड नंबर, तसेच डिजिटल स्वाक्षरी सही करण्यात आली आहे.

त्यामुळे अशा प्रकारचे सातबारे विविध शासकीय उघडकीस आली आहेत. त्यामुळे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला गेल्याच्या बाबीही उघडकीस आल्या आहेत.

आता सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर येणार

याबरोबरच जमिनीवर एखाद्या बँकेचा बोजा असल्यास त्याची माहिती जमीन विक्रीच्या वेळी समजावी, तसेच अधिकारी अथवा तलाठ्यांना एखाद्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित सातबाराधारकास संपर्क साधावयाचा असेल, तर सातबाऱ्यावर असलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर संपर्क साधणे सोपे जाणार आहे, तसेच गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे.

शहरी अथवा ग्रामीण भागात नागरिकांच्या सातबारा उताऱ्यावर मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल नोंदण्यात येणार आहेत. यामुळे जमिनीच्या गैरव्यवहारास आळा बसणार आहे.

1 thought on “आता सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर येणार | 712 utara mobile number update”

Leave a Comment

close button