50,000 प्रोत्साहन अनुदान जमा होणार | 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Updated on:

50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra – नमस्कार मित्रांनो 50,000 प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि केवायसी प्रक्रियेला सुरुवात सुद्धा झालेली आहे, लवकरच काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यात प्रोत्साहन पर अनुदान हे जमा होणार आहेत, त्या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट तुमच्यासाठी या पोस्टमध्ये घेऊन आलेले तर संपूर्ण माहिती नीट वाचून घ्या ही विनंती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांना मदत दिवाळीपूर्वी चार हजार कोटी वितरित होणार. तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान.

राज्यातील 23.14 लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. त्यांना तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहेत. 8 लाख 29 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे.

50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra

दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित केली जाईल. 18 जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्याने तेथील जवळपास 14 लाख 85 हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते. शिंदे-फडणीस सरकारने आता 2017 ते 18, 18 ते 19 आणि 19 ते 2020 या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाईल. ही रक्कम बँकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना जवळपास 12 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीतील जिल्हा बँकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, 12 सोलापूर या जिल्हा बँकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

👇👇👇

जिल्ह्यांनुसार याद्या येथे क्लिक करून डाऊनलोड करा 

प्रोत्साहनपर अनुदान टप्पा

  • पहिला टप्पा

8.29 लाख शेतकरी 4,000 कोटी रुपये

  • दुसरा टप्पा

10 लाख शेतकरी 5,000 कोटी रुपये

  • तिसरा टप्पा

4.85 लाख शेतकरी 1,200 कोटी रुपये

अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच

यंदा बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 21 जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मदत म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत.

त्यात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक व सततचा पण 65 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “50,000 प्रोत्साहन अनुदान जमा होणार | 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra 2024”

  1. 2020/2022पर्यंत ज्यानी वडिलांना ची जमीन मुलांना नावावर करून कर्ज घेतले आहेत आणि पुर्वी वडिलांना कर्ज माफीत नांव नव्हते अशा नवीन कर्ज दार शेतकरी साठी कोणती योजना आहे थोडक्यात सांगाल ऊपकार होतील

  2. ज्या शेतकरी चे कर्ज माफीत नाव नाही आले त्यांच्या जमीन 2020 पासून मुलांना नावावर करून घेतली आहेत कर्ज घेतले दोन वर्षे पूर्ण झाली आहे अशा शेतकरी साठी कोणती योजना आहे. म्हणजे बाप कर्ज माफीत नाव नाही आणि मुलांना प्रोत्साहन निधी योजना अतर्गत लाभ मिळाला नाही.

Leave a comment