Agriculture Subject Include in Syllabus शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
Maharashtra School Education Department include agriculture subject in syllabus decision taken in Meeting of Varsha Gaikwad and Dada Bhuse
सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असून कृषी व शालेय शिक्षण विभाग एकत्रितपणे या विषयाचा अभ्यासक्रम तयार करणार आहेत.
Maharashtra School Education Department include Agriculture Subject
याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
- शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून, तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे.
- कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल
- त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल.
- शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
Intended to Include Agricultural Subject
कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे शेतकरी अणि शेती प्रतिकृतज्ञतेची भावना असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.
जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
Suggestions Given by Varsha Gaikwad on the Subject of Agriculture
शिक्षण व कृषी विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही करणार असून
विद्यार्थ्यांचे वय आणि त्याची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.