मुंबई: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना रक्कम रु. 50,000/- एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.
पात्रता:
- उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
- उमेदवार संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा-2022 करिता पात्र असावा.
(Financial Assistance Scheme for Scheduled Caste Candidates in the State of Maharashtra through Barti for Union Public Service Commission-Civil Service Main Examination 2022)
निकष:
- यशदा,पुणे संस्थेमध्ये मुख्य परीक्षा 2022 प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सदर योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीन वेळाच घेता येईल, ज्यांनी यापूर्वी सदर योजनेचा तीन वेळा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अर्ज करण्यासाठी:
बार्टी संस्थेने खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ.सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून bartiupsc18@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.
- अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- दि. 10 डिसेंबर 2022
- अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 020-2633 3596/ 26333597
- अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक- http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD > BARTI-UPSC-Civil Services Mains Examination 2022Financial Assistance Scheme -Application Form