गेल्या काही वर्षापासून राज्यामध्ये मान्सून कालावधीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांशी लोक वीज पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानूसार वीज पडून होणाऱ्या मृत्युचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नसल्याने या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नाही.
गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी बाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या आपत्तींच्या यादीत ज्या आपत्तींचा समावेश नाही मात्र, राज्यांना त्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते अशा आपत्ती राज्य कार्यकारी समितीच्या मान्यतेने राज्यस्तरावर राज्य आपत्ती म्हणून घोषित करावी.
राज्याने अशी आपत्ती घोषित केल्यानंतर SDRF च्य निकषा नुसार देय असलेली मदत आपत्तीग्रस्तांना तसेच मृतांच्या नातेवाईकांना देय असेल, याबाबत राज्य शासनाने पारदर्शीपणे निर्णय घेणे आवश्यक आहे. (महसूल विभाग)
योजनेची पार्श्वभूमी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक ३१.०५.२०१७ रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून होणारे मृत्यु ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन वीज पडून होणारे मृत्यु याचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्याची आणि आपदग्रस्तांना मदत अनुज्ञेय करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या लेखामध्ये आपण योजनेचा निर्णय, मान्यता व पात्रता, लाभ, कागदपत्रे व संपर्क कुठे साधावा याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
योजना निर्णय
गेल्या काही वर्षापासून राज्यामध्ये मान्सून कालावधीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांशी लोक वीज पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानूसार वीज पडून होणाऱ्या मृत्युचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नसल्याने या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नाही.
गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या आपत्तींच्या यादीत ज्या आपत्तींचा समावेश नाही मात्र, राज्यांना त्या आपत्तीस वारंवार तोंड द्यावे लागते.
अशा आपत्ती राज्य कार्यकारी समितीच्या मान्यतेने राज्यस्तरावर राज्य आपत्ती म्हणून घोषित करावी. राज्याने अशी आपत्ती घोषित केल्यानंतर SDRF च्या निकषा नुसार देय असलेली मदत आपत्तीग्रस्तांना तसेच मृतांच्या नातेवाईकांना देय असेल, याबाबत राज्य शासनाने पारदर्शीपणे निर्णय घेणे आवश्यक आहे.
योजना मान्यता व पात्रता
मान्यता:-
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिनांक ३० मे २०१७ रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून होणारे मृत्यु ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून वीज पडून होणारे मृत्यु याचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत समाविष्ट करण्यास आणि आपदग्रस्तांना मदत अनुज्ञेय करण्यास महसूल व वनविभागाच्या शासन निर्णय दि. ४ ऑक्टोबर २०१७ नुसार मान्यता देण्यात आलेली आहे.
पात्रता:-
- अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीचे वारसदार असावे.
- अंगावर नैसर्गिकरीत्या वीज पडून कमीत कमी ४०% अपंगत्व आलेलं असावे.
- बँक खाते असावे.
योजनेचा लाभ, कागदपत्रे आणि संपर्क
लाभाचा तपशील:-
- या अंतर्गत अंगावर वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल.
- जर वीज पडून ४० ते ६० % अपंगत्व आले असेल तर रुपये ५९,१००/-
- ६०% पेक्षा जास्त अपंगत्व आले तर २ लाख रुपये आर्थिक मदत मिळेल.
- एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधी करिता इस्पितळात दाखल झाल्यास रुपये १२,७००/-
- त्यापेक्षा कमी कालावधीसाठी इस्पितळात दाखल असल्यास रुपये ४,३००/- इतकी मदत अनुज्ञेय आहे.
आवश्यक कागदपत्रे
मृत व्यक्तीच्या वारसांसाठी:
- मृत व्यक्तीचे कारण प्रमाणित करणारा वैद्यकीय दाखला
- वारस असल्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबूक
अपंग व्यक्तींसाठी:
- अपंग व्यक्तींसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- बँक पासबूक
कुठे संपर्क करावा?
मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय