आपले सरकार सेवा केंद्र देणे सुरु, रायगड

प्रेस नोट – नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत जाहिरात

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे बँडींग करण्यात आले आहे.

Aaple Sarkar Seva Kendra Raigad Form

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या(२०११च्या जनगणनेनुसार)किमान २ केंद्रे स्थापन करण्यात येईल.

शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद १०,००० लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

रिक्त असलेल्या सर्व केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी वरील संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ११/०५/२०२१ पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत.

आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.

तपशिल – कालावधी – दिनांक

  • आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी – ३० दिवस | १२/०४/२०२१ ते ११/०५/२०२१
  • प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी – २८ दिवस |१२/०५/२०२१ ते ०९/०६/२०२१
  • प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जावर – २१ दिवस | १०/०६/२०२१ ते ०१/०७/२०२१

 

जिल्हास्तरीय कार्यवाही करिता

रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण केंद्रांची माहिती
एकूण ग्रामीण केंद्र :- ८८४ शहरी एकूण केंद्र :-१०५
कार्यरत केंद्र :- २४३
कार्यरत केंद्र:-८२
रिक्त केंद्र :-६५१
रिक्त केंद्र :- ४२
नियोजित केंद्र :- ६९३

नियोजित केंद्राची तालुकानिहाय संख्या अशी :अलिबाग :- ३९, कर्जत :- ४०, खालापूर :- ३९, महाड :-११२, माणगाव :- ५१, म्हसळा :-३५, मुरुड :- १४, पनवेल :- १०५, पेण :- ५१, पोलादपूर :- ३८, रोहा :- ४६, श्रीवर्धन :- ३६, सुधागड :- ३१,तळा :- २२, उरण :- ३४

 

आपले सरकार सेवा केंद्र FORM Download

 

Leave a Comment

close button